Advertisement

गुलाबजाम खायचाय? मग हे पोस्टर पाहा!

झी स्टुडिओ लवकरच त्यांचा 'गुलाबजाम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. या सिनेमाचा टीजर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. आता या सिनेमाचं नवी पोस्टर लाँच झालं आहे. आणि या पोस्टरमधून सिनेमाची कथा प्रेक्षकांच्या अधिकच परिचयाची होतेय.

गुलाबजाम खायचाय? मग हे पोस्टर पाहा!
SHARES

गुलाबजाम खायला जितका टेस्टी लागतो, तितकाच तो पहायलाही टेस्टी असतो का? अर्थात, असलाच पाहिजे! खायचा गुलाबजाम जितका टेस्टी असतो, तितकाच पाहायचा गुलाबजामसुद्धा टेस्टी असेल. चक्रावलात ना? अहो हा खायचा गुलाबजाम म्हणजे पाकातला आणि पाहायचा गुलाबजाम म्हणजे थिएटरमधला!


टीजरनंतर आता पोस्टर लाँच!

झी स्टुडिओ लवकरच त्यांचा 'गुलाबजाम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. या सिनेमाचा टीजर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. आता या सिनेमाचं नवी पोस्टर लाँच झालं आहे. आणि या पोस्टरमधून सिनेमाची कथा प्रेक्षकांच्या अधिकच परिचयाची होतेय.


सोनालीच्या 'त्या' हास्यामागचं गुपित काय?

टीजर पोस्ट करताना सोनालीने 'माझी लाडकी गोष्ट..राधा आणि आदित्यची..आमच्या स्वयंपाकाची..’ असं सुंदर कॅप्शन दिलं होतं. आता सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरच्या हातात लाटणं दिसत आहे. पोस्टरमध्ये सोनालीच्या चेहऱ्यावर 'अर्थपूर्ण' हास्य तर सिद्धार्थ काहीसा त्रासलेला दिसत आहे. हे पोस्टर ट्विटरवर शेअर करताना 'चवीने खाणाऱ्यांना प्रेमाने वाढायला झी स्टुडिओ घेऊन येतोय 'गुलाबजाम' १६ फेब्रुवारीला!' असं सांगत 'सर्वांना आग्रहाचे निमंत्रण'ही देण्यात आले आहे.


काय आहे सिनेमाची कथा?

गुलाबजाम ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ जाधव) हा खास मराठी खाद्यापदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. तो पुण्यातील राधा (सोनाली कुलकर्णी)ला भेटतो आणि इथूनच त्यांच्या सुंदर मैत्रीला सुरूवात होते. त्यानंतर हे मैत्रीचं नातं नेमकं कोणतं वळण घेतं, आणि त्यातून त्यांच्या दोघांमध्ये काय होतं? हे मात्र तुम्हाला 'गुलाबजाम' चित्रपटातच पाहायला मिळणार आहे! त्यामुळे या गुलाबजामची चव 'खाल्ल्या'नंतरच कळणार आहे!





हेही वाचा

'मेमरी कार्ड'...माहिती ठेवावी लागणार ना भौ!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा