Advertisement

'मेमरी कार्ड'...माहिती ठेवावी लागणार ना भौ!


'मेमरी कार्ड'...माहिती ठेवावी लागणार ना भौ!
SHARES

पहिलं प्रेम...चार मित्रांची अनोखी मैत्री... आणि कोकणचं निसर्गरम्य सौंदर्य! या गोष्टी तुमच्या मेमरीमध्ये आता फिट्ट बसवून घ्या...कारण या गोष्टी घेऊन लवकरच 'मेमरी कार्ड' हा चित्रपट तुमच्या भेटीला येत आहे. येत्या २ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची टॅग लाईनही त्याच्या नावासारखीच अतरंगी आहे...टॅगलाईन आहे 'ठेवावी लागते माहिती'!


चित्रपटात स्मार्टफोनचा 'स्मार्ट'नेस!

स्मार्ट फोन वापरण्यासाठी स्मार्टनेस असावा लागतो आणि तो नसला की होणारी पंचाईत या सिनेमात दाखवली आहे. मात्र, आपल्या माणसांच्या संपर्कात राहण्यासाठी फोनची गरज असतेच असं नाही. हा 'स्मार्ट टच' 'मेमरी कार्ड'मध्ये अनुभवायला मिळणार आहे.


सहज जोडला जाणारा सिनेमा

अतिशय साध्या कथानकावर आधारित या सिनेमात अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत, ज्या आपण सहज आपल्या आयुष्याशी जोडू शकतो. कोकणातील एका लहान गावात दहावीपर्यंत शिकलेला मुलगा कॉलेजसाठी मोठ्या शहरात आल्यावर त्याची होणारी चलबिचल आणि अनोळखी मुलीने शहराची भिती घालवण्यासाठी केलेली मदत, असे अनेक किस्से या चित्रपटात पहायला मिळतील.


सिनेमाचा शंकर महादेवन टच!

सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील गणपती बाप्पाचं खास गाणं आणि पुण्यकर उपाध्याय याचा एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हळुवार प्रेमाचा 'रुण झुण' नाद ऐकवणारे गायक जावेद अली आणि गायिका महालक्ष्मी अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत.


प्रितेश-मितेशचा पहिलाच मराठी सिनेमा

या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संगीत प्रितेश कामत-मितेश चिंदरकर या जोडगोळीने केले आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात दाखल झालेल्या प्रितेश-मितेश यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता संजय खापरे आणि सुनील तावडे त्याचबरोबर रिषभ पुरोहित, विभूती कदम, अपूर्वा परांजपे, प्रणाली चव्हाण, आदित्य नाकती, कुणाल शिंदे, हितेश कल्याणकर, दिनेश पाटील, कल्पना बांदेकर, विजय चव्हाण, अक्षता कांबळी या नवोदित कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.



हेही वाचा

'न्यूड'ला सेन्सॉरचं 'ए' सर्टिफिकेट, प्रदर्शनाचा मार्ग मोकळा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा