'न्यूड'ला सेन्सॉरचं 'ए' सर्टिफिकेट, प्रदर्शनाचा मार्ग मोकळा


SHARE

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'न्यूड' या वादग्रस्त चित्रपटाला सेन्सॉरकडून 'अ' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे चित्रपटात एकही कटशिवाय चित्रपटाला सेन्सॉरचं 'अ' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळाल्यानं न्यूडच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोव्यातील 'इफफी' (IFFI) आंतराष्ट्रीय महोत्सवातून हा चित्रपट वगळण्यात आला होता. चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता.न्यूडला महोत्सवातून वगळल्यामुळे देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून वाद सुरू झाला होता.


अशी आहे चित्रपटाची कथा:

न्यूड मॉडेल असलेल्या एका मुलीची ही कथा आहे. त्या मुलीला मुंबईत आपलं करिअर घडवायचं असतं. तिचा मुंबईत जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या