गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

भाजपासोबत सत्तेत असूनही वारंवार भाजपाला कोंडीत पकडणाऱ्या शिवसेनेने गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ३६ जागांवर आपले उमेदवार उभे केले खरे, पण यापैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. एवढं कमी की काय परंतु शिवसेनेच्या सर्वच उमेदवाराचं डिपाॅझिटही जप्त झालं आहे.

फक्त ०.०८ टक्के मतं

शिवसेनेने उभे केलेल्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे ३६ उमेदवारांना मिळून जवळपास फक्त २८ हजार ६६० मतं मिळाली आहेत. ही मतं एकूण मतदानाच्या ०.०८ टक्के आहेत.

१ हजारहून जास्त मतं फक्त ८ जणांनाच

सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या केवळ ८ उमेदवारांनाच १ हजार मतांचा आकडा ओलांडता आला. यापैकी लिंबायत मतदारसंघातील सम्राट पाटील यांना सर्वाधिक ४ हजार ७५ मतं मिळाली आहेत.

'डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल' 

भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं लागेल, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. तसंच विजयाचं सेलिब्रेशन म्हणून भाजपने 'सामना' पथकाचं ढोल वाजवून जल्लोष केला.


हेही वाचा-

भाजपाच्या मुंबई टीमने सूरत जिंकलं!

मुंबईतला पत्रकार बनला गुजरातमध्ये आमदार, जिग्नेश मेवाणीने चारली भाजपाला धूळ


पुढील बातमी
इतर बातम्या