Advertisement

भाजपाच्या मुंबई टीमने सूरत जिंकलं!

गुजरात निवडणुकीत सूरतमधील १६ मतदारसंघाची जबाबदारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील मुंबई भाजपाच्या टीमवर होती. सूरतची जबाबदारी असलेल्या भाजपाच्या मुंबई टीमने उत्तम कामगिरी करत १६ पै १५ जागा जिंकल्या आहेत.

भाजपाच्या मुंबई टीमने सूरत जिंकलं!
SHARES

प्रतिष्ठेच्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपली सारी राजकीय ताकद पणाला लावली होती. देशभरातील भाजपशासीत राज्यांतून मुख्यमंत्र्यांसहित नेतेमंडळींची कुमक लावून विजयाचा पाया रचण्यात आला. त्याला अपेक्षित यश मिळाल्याचं निकालानंतर दिसून येत आहे. विशेषकरून सूरतची जबाबदारी असलेल्या भाजपाच्या मुंबई टीमने उत्तम कामगिरी करत १६ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत.


सूरतची जबाबदारी कुणावर?

गुजरात निवडणुकीत सूरतमधील १६ मतदारसंघाची जबाबदारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील मुंबई भाजपाच्या टीमवर होती.


कठीण लक्ष्य

जीएसटी आणि नोटाबंदीमुळे सूरतमधील व्यापारी नाराज होता. त्यात पाटीदार समाजाचाही या भागात प्रभाव आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी इथं २ सभा घेतल्या. माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांनीही प्रचार केला. त्यामुळे भाजपसाठी सूरतची वाटचाल सर्वात अवघड बनली होती. तरीही सूरतमधे १६ पैकी १५ जागा जिंकण्यात भाजपाला यश मिळालं.


मुंबई कार्यालयात आनंदोत्सव

गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित झाल्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात जल्लोषाला सुरूवात केली. 'भारत माता की जय,' 'वंदे मातरम' आणि 'मोदी–मोदी'च्या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.



'बुलेट ट्रेन' जिंकली - आशिष शेलार

या निकालासाठी शनिवारी रात्रीच प्रदेश कार्यालयाच्या आवारात अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजय सामान्य माणसाला आनंद देणारा आहे. विजयाचं वर्णन करावं तेवढ कमीच आहे. अभूतपूर्वी विजयाचं कारण तीन पायावर चालणारी लंगडी काँग्रेस पराभूत झाली आहे, असं ट्विट करत आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली.



हेही वाचा-

गुजरात निवडणूक: १ किलो सोनं घालून केला प्रचार, शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपाॅझिट झालं जप्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा