AAP लढवणार विधानसभा निवडणूक!

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याचा निर्धार आम आदमी पार्टीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.  

सत्तेचं विकेंद्रीकरण व सत्ता राबविण्याच्या तसंच धोरणं आखण्याच्या प्रक्रियेत सामान्य माणसाचा सहभाग यासाठी आपला पक्ष आग्रही असेल, असं पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं. राज्यातील दुष्काळ, पूर, सामाजिक न्याय, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवर सत्ताधारी अपयशी ठरल्याचं ‘आप’चं म्हणणं आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढविल्या होत्या. मात्र त्यांना दारूण पराभवाला समोर जावं लागलं. त्यानंतर राज्यातील कोणतीही निवडणूक आम आदमी पक्षानं लढवलेली नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या साथीने आम आदमी पक्ष नशीब आजमावेल असं म्हटलं जात होतं.

या निवडणुकीची तयारी करण्यासाठी‘आप’तर्फे एका समितीची देखील घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये

  •  संयोजक - रंगा राचुरे
  •  सह-संयोजक - किशोर मध्यान
  •  सचिव - धनंजय शिंदे
  •  कोषाध्यक्ष - जगजीत सिंह
  •  सदस्य - प्रीति शर्मा मेनन
  •  सदस्य - देवेंद्र वानखेड़े
  •  सदस्य - कुसुमाकर कौशिक
  •  सदस्य - अजिंक्य शिंदे
  •  सदस्य - डॉ सुनील गावित
  •  सदस्य - मुकुंद किरदत
  •  सदस्य - संदीप देसाई

यांचा समावेश आहे. 

 


हेही वाचा-

पलटवार! आता मनसेनं पाठवली ‘ईडी’ला नोटीस

बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासहीत ५० जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश


पुढील बातमी
इतर बातम्या