Advertisement

बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासहीत ५० जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSC) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पुढील ५ दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासहीत ५० जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSC) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पुढील ५ दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले अजित पवार यांच्यासोबत विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे असे जवळपास ५० नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कर्जवाटपात अनियमितता

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्याची शिखर बँक म्हणून ओळख जाते.  या बँकेने केलेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करत याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. 

अहवाल असूनही दुर्लक्ष

या प्रकरणी नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांना हे आदेश दिले. हेही वाचा-

महापालिका बरखास्त करून टाका- अजित पवार

ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला सर्व विरोधीपक्षनेत्यांचं आंदोलनसंबंधित विषय
Advertisement