Advertisement

ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला सर्व विरोधीपक्षनेत्यांचं आंदोलन

मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद असून सर्व विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग आहे.

SHARES

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत ईव्हीएमविरोधात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सर्व विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी या सर्व नेत्यांनी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर  घेण्याची मागणी केली. 

सर्वसामन्य जनतेचं मत

निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात की नाही, यासाठी सर्वसामन्य जनतेचं मत आजमावून बघण्यासाठी राज्यातील घराघरांत फॉर्म वाटले जाणार आहेत. तेवढंच नाही तर, निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर दबाव ठाकण्यासाठी २१ ऑगस्टला ईव्हीएमविरोधात मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व विरोधी पक्षनेते सहभाग घेणार आहेत. आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ईडी प्रकरणाबाबत प्रश्न

पत्रकार परिषदेदरम्यान, राज ठाकरे यांना ईडी प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'मला ईडीकडून(अंमलबजावणी संचालनालय) अजूनतरी कुठलीही अशा प्रकारची कुठलीही नोटीस मिळालेली नाही. याबाबत मला देखील तुमच्या प्रमाणेचं वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरून ही माहिती मिळाली', असं त्यांनी सांगितलं.  

लाइव्ह अपडेट्स:

  • ईव्हीएम मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षनेते एकवटले.
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार  दाखल.
  • ईव्हीएमविरुद्ध आंदोलनात सेना-भाजपनं यायला हवं होतं
  • सर्व विरोधी पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी - राज ठाकरे
  • पारर्दशकपणे निवडणूक व्हायला पाहिजे - अजित पवार
  • विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्यात, सर्वांची मागणी - अजित पवार
  • विरोधी पक्षांसोबत नागरिक, एनजीओंचीही मागणी - अजित पवार 
  • बॅलेट पेपरसाठी महाराष्ट्रातल्या घराघरांत फॉर्म वाटला जाणार -राज ठाकरे
  • ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा - राज ठाकरे
  • या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल - राज ठाकरे
  • ईव्हीएम मशीनमधील मतांचा गोंधळ का होतो? - राज ठाकरे
  • अमेरिकेत ट्रम्प यांच्या विजयानं संशयास्पद वातावरण - राज ठाकरे
  • त्याच अमेरिकेत भारतातल्या ईव्हीएमची चिप बनते - राज ठाकरे
  • ईव्हीएम आंदोलनात मतभेद बाजूला ठेवून एकत्र
  • १५ ऑगस्टला ग्रामसभेत ठराव मंजुर करा - राजू शेट्टी
  • निवडणूक प्रक्रीयेवर विश्वास दृढ होणं गरजेचं - छगन भुजबळ
  • जनतेच्या विश्वासासाठी मतपत्रिकेत मतदान व्हावं - छगन भुजबळ
  • २१ तारखेचा मोर्चा हा जनतेचा असणार आहे. राजू शेट्टी
  • निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी आंदोलन - बाळासाहेब थोरात
  • राजू शेट्टी यांच ग्रामीण भागातील मतदारांना आवाहन
  • ईव्हीएममुळं मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती - बाळासाहेब थोरात
  • भाजपाला जिंकण्याचा विश्वास असेल तर बॅलेट पेपर का नको? - राज ठाकरे
  • निवडणूक आयोगावर अजिबात विश्वास नाही - राज ठाकरे
  • लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा - जयंत पाटील


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा