पलटवार! आता मनसेनं पाठवली ‘ईडी’ला नोटीस

राज ठाकरेंची चौकशी आटोपून २४ तास होत नाही, तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पलटवार करत चक्क ‘ईडी’लाच नोटीस पाठवली आहे.

SHARE

कोहिनूर मिल आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालया (ईडी) ने राज ठाकरे यांना नोटीस पाठवून चौकशीला बोलावलं होतं. ही चौकशी आटोपून २४ तास होत नाही, तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पलटवार करत चक्क ‘ईडी’लाच नोटीस पाठवली आहे.

सूचक इशारा 

राज ठाकरे तब्बल साडेआठ तास ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. या चौकशीत त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्याचं म्हटलं जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर राज यांनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी ‘तुम्ही कितीही चौकशी करा, माझं तोंड बंद होणार नाही,’ या एका वाक्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला. 

कशाबद्दल नोटीस?

मनसेने यासंर्दभात ट्विट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरलं आहे. पण आम्ही ह्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आणि या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार?  असा प्रश्नही मनसेने विचारला आहे.

मनसेने याआधीही राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत हव्या यासाठी आंदोलने केली आहेत.  त्यामुळे मनसेच्या या मागणीची दखल सरकार घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.हेही वाचा-

साडे आठ तासानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर

बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासहीत ५० जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेशसंबंधित विषय
ताज्या बातम्या