मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळाल्याचं शल्य- छगन भुजबळ

मराठी भाषेला अभिजात (Marathi language) दर्जा मिळावा यासाठी विधीमंडळात ठराव सादर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (status of elite language) मिळावा, यासाठी केंद्राकडे मागणी करावी, असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केलं.

हेही वाचा-

मराठी भाषेला अभिजात दर्जा (status of elite language) मिळावा यासाठी केंद्राकडे मागील १० वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. उलट १६ वर्षांपूर्वी तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा अभिजात आहे, हे सिद्ध करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्याचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली ५०० पानी अहवाल केंद्राकडे सादर केला. त्यानंतर केंद्राच्या समितीकडून ५ फेब्रुवारी २०१५ ला हा अहवाल मान्य करून पुढे पाठवण्यात आला. मात्र अजूनही त्यावर निर्णय झालेला नसल्याचं भुजबळ यांनी यावेळी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिलं. 

हेही वाचा-

संत ज्ञानेश्वरांनी अमृताहूनही गोड अशी उपमा मराठी भाषेला दिली. मराठी भाषा २ हजार वर्षे जुनी असल्याचे सबळ पुरावे असतानाही आजवर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही. याचं शल्य मराठी माणसाच्या मनात आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भुजबळ यांनी सभागृहात केली.

पुढील बातमी
इतर बातम्या