Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा, न शिकवल्यास १ लाखांचा दंड

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय (Marathi subject compulsary in all schools) शिकवणं सक्तीचं करण्यात आलं असून हा नियम मोडणाऱ्या शाळेच्या संस्था प्रमुखांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा, न शिकवल्यास १ लाखांचा दंड
SHARES

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय (Marathi subject compulsary in all schools) शिकवणं सक्तीचं करण्यात आलं असून हा नियम मोडणाऱ्या शाळेच्या संस्था प्रमुखांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi) मराठी भाषा दिनाच्या (marathi bhasha din) पूर्वसंध्येला घेतला. 

हेही वाचा- तुम्ही सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का नाही? आदित्य ठाकरेंनी भाजपला घेरलं

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी दरम्यान मराठी हा विषय अनिवार्य करण्यात येईल. पालक विद्यार्थ्यांना फ्रेंच शिकवू शकतात, तर मराठी का नाही? यासंदर्भातील विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात येईल. हे विधेयक पारित झाल्यानंतर दक्षिणेकडील राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही सीबीएसई (cbse), आयसीएसई (icse), आयजीसीएसई (igse) आणि आयबी (ib) इ. बोर्डांच्या शाळांमध्येही मराठी विषय अनिवार्य होईल. राज्यभरातील २५ हजार शाळांमधील विद्यार्थी या निर्णयामुळे मराठी विषयाचा अभ्यास करतील, असं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (marathi bhasha minister subhash desai) यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. 

त्यानुसार विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यांतील सर्व शाळेत मराठी विषय शिकवणं सक्तीचं (Marathi subject compulsary in all board schools)  करणारं विधेयक सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत मांडलं. शाळा कुठल्याही मंडळाची वा भाषेची असो प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकवावाच लागेल. ज्या शाळा मराठी विषय शिकवणार नाहीत, अशा शाळेच्या संस्थाप्रमुखांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांना मराठी विषय शिकवणं बंधनकारक असणार आहे.

या विधेयकातील तरतूदीनुसार टप्प्याटप्प्याने मराठी विषय सक्तीचा करण्यात येईल. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली आणि सहावीसाठी मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात येईल. तर शेवटच्या टप्प्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि दहावीसाठी मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात येईल.

नियमानुसार सर्व शाळांमध्ये मराठी बोलण्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोणतेही निर्बंध लादता येणार नाहीत, असंही या विधेयकात म्हटलं आहे.


हेही वाचा- वाहनाला बिनधास्त लावा मराठीतली नंबरप्लेट

यासंदर्भात विविध बोर्डांच्या शाळांच्या संस्था प्रमुखांशी चर्चा करण्यात आल्यानंतर संबंधित शाळांनी मराठी विषय शिकवण्यास होकार दिला आहे. त्यामुळे सर्व मंडळांच्या शाळांत मराठी विषय शिकवण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेतील प्रश्नाचं उत्तर देताना दिली.    

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा