Advertisement

तुम्ही सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का नाही? आदित्य ठाकरेंनी भाजपला घेरलं

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरुन सध्या भाजपचे (bjp) आमदार सभागृहात गोंधळ घालत आहेत. परंतु राज्यात आणि केंद्रात भाजपचं बहुमताचं सरकार असतानाही ​सावरकरांना (veer savarkar)​​​ भारतरत्न का देता आला नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.

तुम्ही सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का नाही? आदित्य ठाकरेंनी भाजपला घेरलं
SHARES

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरुन सध्या भाजपचे (bjp) आमदार सभागृहात गोंधळ घालत आहेत. परंतु राज्यात आणि केंद्रात भाजपचं बहुमताचं सरकार असतानाही सावरकरांना (veer savarkar) भारतरत्न का देता आला नाही? असा प्रश्न विचारत हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचं वक्तव्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांनी केलं. 

हेही वाचा- फडणवीसजी आधी माफी मागा, आदित्य ठाकरे संतापले

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (maharashtra assembly budget session) तिसऱ्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer savarkar)  पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं (bjp) विधानसभा अध्यक्षांकडं सादर केलेला सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव सभागृह अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावला. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. तर सभागृहाबाहेर येऊन सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi)यांना २ पत्रं लिहिली होती. या पत्रात त्यांनी वीर सावरकरांना भारतरत्न (bharat ratna) देण्याची मागणी केली होती. परंतु या दोन्ही पत्रांची दखल केंद्र सरकारने घेतली नाही. या काळात इतरांना भारतरत्न देण्यात आला. याचाच अर्थ खुद्द राज्यात आणि केंद्रात भाजपचं बहुमताचं सरकार असूनही वीर सावरकरांना भारतरत्न देता आला नाही. असे भाजप नेते सध्या विधानसभेत गोंधळ घालत आहेत. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने कुणालाही न विचारता नोटबंदीचा निर्णय घेतला, तसा निर्णय वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या बाबतीतही घेता येऊ शकतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा- वीर सावरकरांचं देशासाठी मोठं योगदान- अजित पवार

तर, गौरवपर प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेतला. आपल्या सभागृहाचं कामकाज प्रथेनुसार चालतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतीदिन पहिल्यांदाच आलेला नाही, तर दरवर्षी येतो. त्यामुळे मी वीर सावरकरांना आदरांजली वाहतो. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु त्यांचा गौरवपर प्रस्ताव मांडून भाजप नेत्यांना काय साधायचं आहे हे कळत नाही. राज्य सरकारकडून अपेक्षा करता मग तुम्ही सत्तेत असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?, असा प्रश्न अजित पवार (ajit pawar) यांनीही उपस्थित केला.   



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा