Advertisement

फडणवीसजी आधी माफी मागा, आदित्य ठाकरे संतापले

भाजपच्या एल्गार आंदोलनादरम्यान विधानसभेतील विरोधी ​पक्षनेते देवेंद्र फडणवीस​​​ (Devendra fadnavis) यांनी केलेलं भाषण शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे.

फडणवीसजी आधी माफी मागा, आदित्य ठाकरे संतापले
SHARES

भाजपच्या एल्गार आंदोलनादरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी केलेलं भाषण शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. या भाषणात त्यांनी शिवसेनेला (shiv sena) उद्देशून काढलेल्या आक्षेपार्ह शब्दाबद्दल जाहीर माफी मागा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

हेही वाचा- हे तर विश्वासघातकी सरकार, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

भाजपने (bjp) मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी महाआघाडी सरकारविरोधात (maha vikas aghadi) राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं होतं. राज्यभरात विविध ठिकाणी ४०० आंदोलनं होत असताना मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महत्त्वाचे भाजप नेते सहभागी झाले होते. 

या आंदोलनात भाषण करताना, एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. काँग्रेसचे नेते छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर (veer savarkar) यांच्याबद्दल अपशब्द काढून त्यांना अपमानीत करत आहे. परंतु सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना (shiv sena) मूग गिळून गप्प आहे. कोणी तरी म्हणतो १०० कोटी वर १५ कोटी भारी आहे. वारीस की लावारीस आम्ही त्याला सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. जशास तसं उत्तर कसं देतात हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे, असं फडणवीस म्हणाले होते.

हेही वाचा- वीर सावरकरांचं देशासाठी मोठं योगदान- अजित पवार

राज्यातील सत्तेत बसलेलं सरकार हे जनतेने निवडून दिलेलं नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. आमच्यासोबत जो विश्वासघात झाला, त्याबद्दल आम्हाला चिंता नाही. कारण आम्ही लढणारे आहोत. पुन्हा मैदानात उतरून राज्य मिळवू, असंही ते म्हणाले होते.

त्याबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी लिहिलं की, देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहील, पण बांगड्या घातल्यासारखे शब्दप्रयोग करुन टीका करणं बंद केलं पाहिजे.  तसंच अशा पद्धतीच्या टीकेसाठी तुम्ही माफी मागितली पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणं अपमानास्पद वाटतं, अशा शब्दांत ठाकरे यांनी फडणवीस (Devendra fadnavis) यांना झापलं आहे. 

हेही वाचा- ‘हिशोब' मांडावाच लागेल, आदित्य ठाकरेंना मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा