Advertisement

हे तर विश्वासघातकी सरकार, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

उद्धवजी बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा कुणाची होती? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला.

हे तर विश्वासघातकी सरकार, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
SHARES

उद्धवजी बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा कुणाची होती?  असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas aghadi) हल्ला चढवला. 

भाजपने महाआघाडी सरकारविरोधात (maha vikas aghadi) मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं होतं. राज्यभरात विविध ठिकाणी ४०० आंदोलनं होत असताना मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात देवेंद्र फडणवीस, (devendra fadnavis) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. 

हेही वाचा- ‘हिशोब' मांडावाच लागेल, आदित्य ठाकरेंना मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा

यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून (farmers loan waiver scheme) महाविकास आघाडी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर खरपूस टीका केली. राज्यातील सत्तेत बसलेलं सरकार हे जनतेने निवडून दिलेलं नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. आमच्यासोबत जो विश्वासघात झाला, त्याबद्दल आम्हाला चिंता नाही. कारण आम्ही लढणारे आहोत. पुन्हा मैदानात उतरून राज्य मिळवू. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना या सरकारने विश्वासघाताची मालिका सुरूच ठेवली आहे. उद्धवजी बांधावर जाऊन तुम्ही हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं, ते आधी सांगा असं म्हणत, फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरलं.

आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा (farmers loan waiver scheme) उल्लेख नसताना तसंच काळजीवाहू सरकार असूनसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. राहिलेली रक्कम नवीन सरकारकडून मिळेल असं वाटलं होतं, पण वचनभंगाची सुरुवात झाली आहे. ज्या गतीने कर्जमाफी दिली जातेय, त्याकडे पाहता सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला सरकारला ४०० वर्ष लागतील. जलयुक्त शिवार योजनेवर शंका उपस्थित केली जात आहे. मराठावाड्याला पाणी पुरवठा करण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली. त्रुटी असतील, तर त्या सुधारा. पण कामच करायचं नसेल, तर १७ बहाणे सांगता येतात, असं ते म्हणाले.

हेही वाचा- जुने दिवस आठवले, अजित पवारांचा भाजपला टोला

काँग्रेसचे नेते छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर (veer savarkar) यांच्याबद्दल अपशब्द काढून त्यांना अपमानीत करत आहे. परंतु सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना (shiv sena) मूग गिळून गप्प आहे. कोणी तरी म्हणतो १०० कोटी वर १५ कोटी भारी आहे. वारीस की लावारीस आम्ही त्याला सोडणार नाही. राहुल गांधी (rahul gandhi) यांनी मुंबईकरांना ५०० चौ.फुटांचं घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं? उलट बिल्डरांचे खिसे भरण्याचं काम सुरू असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा