Advertisement

वीर सावरकरांचं देशासाठी मोठं योगदान- अजित पवार

स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Veer savarkar) देशासाठी मोठं योगदान आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. पण ज्या व्यक्ती आज हयातच नाहीत, त्यांच्याविषयी वक्तव्य करून काहीजण समाजात गैरसमज निर्माण करताहेत, असं अजित पवार म्हणाले.

वीर सावरकरांचं देशासाठी मोठं योगदान- अजित पवार
SHARES

स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Veer savarkar) देशासाठी मोठं योगदान आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. पण ज्या व्यक्ती आज हयातच नाहीत, त्यांच्याविषयी वक्तव्य करून काहीजण समाजात गैरसमज निर्माण करताहेत. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की कुणीही अशा प्रकारे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) म्हणाले.

हेही वाचा- इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून मोठा दिलासा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (maharashtra assembly budget session) तिसऱ्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer savarkar)  पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं (bjp) विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाबाबत अजित पवार (ajit pawar) यांना विचारलं असता, ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत, देशाच्या तसंच महाराष्ट्राच्या उभारणीत मोठं योगदान दिलेल्या व्यक्तींचा आदर केलाच पाहिजे. ज्या व्यक्ती जाऊन अनेक वर्षे झालीत, त्यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काहीच कारण नाही. 


महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi government) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठीच भाजपने गौरवपर प्रस्ताव मांडल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर विचारलं असता अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितलं की,' सत्ताधारी असो किंवा विरोधक एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात सभागृहात एखादी चर्चा येणार असेल तर कुणाला अडचण वाटण्याचं कारण नाही. सभागृह हे नियमानुसार चालतं. त्यात कामकाज सल्लागार समिती असते, अध्यक्ष महोदय असतात, सभापती महोदय असतात. सगळेजण बसून त्यासंदर्भातला निर्णय घेतात. त्यात कुठलं कामकाज आज करायचं, काय करायचं सगळ्या सभागृहाला विश्वासात घेऊन सर्वसंमतीने ठरलेलं कामकाज बाजूला ठेवूनही चर्चा केली जाऊ शकते. महाराष्ट्रातील सभागृहात याआधीही मोठ्या व्यक्तींवर चर्चा झालेल्या आहेत. गेल्या ३० वर्षांत सभागृह सदस्य म्हणून मी अनेकदा अशा चर्चांमध्ये भाग घेतला आहे. तुम्ही मागचे रेकाॅर्ड तपासून बघू शकता. त्यामुळे चर्चा करण्यात कुठलीही अडचण नाही,' असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा