Advertisement

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

महाराष्ट्रातील सात जागांसह देशभरातील एकूण ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक
SHARES

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. महाराष्ट्रातील सात जागांसह देशभरातील एकूण ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. या सर्व जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. ३0 मार्चपूर्वी ही निवडणूक पार पाडायची असल्याने मतदानासाठी आयोगाने २६ मार्च ही तारीख निश्‍चित केली आहे. ६ मार्च रोजी निवडणुकीचीराज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ मार्च असेल. १६ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून १८ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख असेल. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय चित्र आहे. या स्थितीत राज्यसभेच्या निवडणुका होत असल्याने भाजपसाठी या निवडणुकीत मोठे आव्हान असेल असे दिसत आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील ७ पैकी ४ जागी विजय मिळवू शकते, इतकं संख्याबळ आघाडीतील तिन्ही पक्षांकडे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा एक उमेदवार रिंगणात असावा व चौथी जागा एखाद्या क्षेत्रातील तज्‍जञ व्यकीला द्यावी, असे मत शिवसेनेच्या वतुर्ळातून व्यक्त करण्यात आले आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र हा फॉम्युर्ला मान्य नसल्याची चर्चा आहे.

निवृत्त होणा-या सदस्यांमधे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल बोरा, दिग्वीजय सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांचा समावेश आहे. सर्वात जास्त सात रिक्त जागा महाराष्ट्रातून आहेत, तर तामिळनाडुतून सहा जागा रिक्त होत आहेत.संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा