राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या ट्विटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ट्विट केलं होतं. त्यानंतर, आता पुन्हा एकदा त्यांनी ट्विट केलं असून, शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
'आडनाव ठाकरे असल्यामुळं कोणी ठाकरे होत नाही', अशा बोचऱ्या शब्दात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर महिला शिवसैनिकांनी अमृतांविरोधात 'जोडे मारो' आंदोलन केलं. या आंदोलनाला अमृता यांनी शायरीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी त्या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर 'लोकांना मारहाण करून त्यांचं नेतृत्व करता येणार नाही. दगडफेक, चप्पल दाखवणं हे तुमचं जुनेच प्रकार आहे', अशी टीका अमृता यांनी केली आहे.
या प्रकरणी अमृता फडणवीस वेगळे व्यक्तिमत्व, त्यांचे निर्णय त्या घेतात. त्या कधीही राजकारणात येणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. अमृता यांनी केलेल्या राजकीय टीका टिप्पणींवरही ट्रोलिंग होते. अनेकदा अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, ते देखील त्यांना भोगावेच लागते, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा -
गोएअरची उड्डाणं पुन्हा रद्द, प्रवासी संतप्त