Advertisement

गोएअरची उड्डाणं पुन्हा रद्द, प्रवासी संतप्त

गोएअरच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळापत्रकातील काही त्रुटींमुळे ही स्थिती ओढावली आहे.

गोएअरची उड्डाणं पुन्हा रद्द, प्रवासी संतप्त
SHARES

सलग दुसऱ्या दिवशी गोएअरची २० उड्डाणं ऐनवेळी रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर, नागपूर, कोचीन आणि पोर्ट ब्लेअरहून नियोजित असणारी ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत

गोएअरच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळापत्रकातील काही त्रुटींमुळे ही स्थिती ओढावली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसही या कंपनीची काही उड्डाणं रद्द होऊ शकतात, अशी माहिती मिळाली आहे

गोएअरचा गोंधळ पाहता हवाई वाहतूक नियंत्रण विभागानं (डीजीसीए) व्यवस्थापकांना फटकारलं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांकडून नियमित वेळापेक्षा जास्त काळ काम करून घेतल्यामुळे व्यवस्थापकांना फटकारण्यात आलं आहे. त्यामुळेच ही स्थिती ओढावल्याची माहिती मिळते आहे. या प्रकऱणी अद्याप गोएअरकडून अधिकृतपणे पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.



हेही वाचा

'जेट एअरवेज'चं विमान पुन्हा होणार टेक आॅफ?

उड्डाणपुलाहून दुचाकी पडली, तरुणाचा जागीच मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा