Advertisement

'जेट एअरवेज'चं विमान पुन्हा होणार टेक आॅफ?

दिवाळखोरीमुळे मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या 'जेट एअरवेज'चे चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

'जेट एअरवेज'चं विमान पुन्हा होणार टेक आॅफ?
SHARES

दिवाळखोरीमुळे मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या 'जेट एअरवेज'चे चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. 'जेट एअरवेज'च्या विमानांनी पुन्हा टेक आॅफ करावं, यासाठी केंद्र सरकारनं विचारणा केली असल्याचा दावा जगप्रसिद्ध उद्योजक आणि हिंदुजा समूहाचे सह-संस्थापक गोपीचंद पी. हिंदुजा यांनी केला आहे. त्याशिवाय 'जेट एअरवेज'च्या कर्जात फसलेल्या काही बँकांनी हिंदुजा समूहाशी संपर्क केला असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

जेट एअरवेज विरोधात बँकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) धाव घेतली आहे. केंद्र सरकारकडून आर्थिक अनियमिततेबाबत जेट एअरवेजची चौकशी केली जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे जेट एअरवेजमधील गुंतवणूक जोखमीची ठरेल, या हेतूनं हिंदुजा समूहानं जेट एअरवेजच्या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली होती

रविवारी पुन्हा एकदा जेट एअरवेजच्या लिलाव प्रक्रियेची दुसरी फेरी जाहीर झाली आहे. या लिलावात इच्छुकांना ६ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करता येतील. ९ जानेवारीला यशस्वी निवीदा जाहीर केली जाणार आहे. जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. मात्र कुठल्याही ठोस निर्णयापर्यंत येण्यासाठी आणखी काहीवेळ लागेल, असे गोपीचंद पी.हिंदुजा यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा

दुरुस्ती कामामुळं कोकण रेल्वेवरील गाड्या उशिरानं धावणार

प्रवाशांची गर्दी ठरतेय जीवघेणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा