उड्डाणपुलाहून दुचाकी पडली, तरुणाचा जागीच मृत्यू

धडक इतकी जोरदार होती की, मागे बसलेला ओमकार हा उड्डाणपूलाच्या सुरक्षा भिंतीवर फेकला गेला. मात्र दुचाकीवरील नियंत्रण सुटलेल्या रोहित उड्डाणपूलाहून खाली पडला.

उड्डाणपुलाहून दुचाकी पडली, तरुणाचा जागीच मृत्यू
SHARES

रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उड्डाणपुलाहून पडून मृत्यू झाल्याची घटना सांताक्रूझच्या वाकोला परिसरात घडली आहे. रोहित घोसाळकर असे या मृत आरोपीचे नाव असून या प्रकरणी वाकोला पोलिसांनी रिक्षा चालक विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या दृर्घटनेत रोहितचा मित्र ओमकार देवरुखकर (२५)  थोडक्यात बचावला आहे.

रोहित हा वडाळाळ्याचा रहिवाशी असून तो ओमकारसोबत मालाडला गेला होता. दोघेही फोटोग्राफर असून मालाडला एका लग्नसमारंभाच्या शूटसाठी गेले होते. लग्नसमारंभाहून दोघेही परतत असताना. वाकोला उड्डाणपूलावर त्याच्या दुचाकीला एका रिक्षा चालकाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, मागे बसलेला ओमकार हा उड्डाणपूलाच्या सुरक्षा भिंतीवर फेकला गेला. मात्र दुचाकीवरील नियंत्रण सुटलेल्या रोहित उड्डाणपूलाहून खाली पडला. या दुर्घटनेत ओमकार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात रोहितचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर रिक्षा चालकाने पळ काढला असून त्याच्या विरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिस महामार्गांवरील सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपी रिक्षा चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. फरार रिक्षाचालकावर भारतीय दंडविधान २७९, ३०४(अ), ३३८, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा