25 मेला भारत बंदची हाक, जाणून घ्या मुंबईत काय सुरू काय बंद

केंद्र सरकारने इतर मागास जातींची जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिल्यानंतर BAMCEF ने 25 मे रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. BAMCEF व्यतिरिक्त 25 मे रोजीच्या भारत बंदला बहुजन मुक्ती पार्टीचाही पाठिंबा मिळाला आहे. 25 मे रोजी होणाऱ्या भारत बंदला बहुजन क्रांती मोर्चाच्या राष्ट्रीय निमंत्रकांनीही पाठिंबा दिला आहे.

बामसेफने भारत बंदची घोषणा केली असली तरी मुंबई आणि परिसरात त्याचा फारसा परिणाम होणार नाही. सरकारी कार्यालयांबरोबरच खासगी कार्यालयेही सुरळीत सुरू राहतील. परिवहन सेवेवरही त्याचा काही परिणाम होण्याची शक्यता नाही.

सोशल मीडियावर बंदची मोहीम जोरात सुरू आहे. केंद्र सरकार OBC ची जातनिहाय जनगणना न करणे, EVM घोटाळा, SC, ST, OBC यांना खाजगी क्षेत्रात आरक्षणाची अंमलबजावणी न करणे, कायदा करून शेतकऱ्यांना MSP हमीभाव देणे आणि NRC, NPR, CAA ला विरोध, लॉकडाऊन मधील चोरटे कामगारांच्या विरोधात केलेले कामगार कायदे, सक्तीचे लसीकरण, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे आदी मागण्यांसाठी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे.


हेही वाचा

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणारच - संजय राऊत

भाजपने राज ठाकरेंच्या बाबतीत असे का केले समजत नाही - संजय राऊत

पुढील बातमी
इतर बातम्या