लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'एकला चलो रे' ची हाक दिलेली असताना भाजपाकडून युतीसाठी सातत्याने प्रयत्न होताना आतापर्यंत दिसून येत होते. आता मात्र भाजपाने कठोर पवित्रा घेतला असून शिवसेनेला युतीच्या निर्णयासाठी अल्टिमेटम दिल्याच्या माहिती समोर येत आहे.
युतीचा निर्णय लवकर घ्या नाही तर लोकसभा-विधानसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जा असा दमच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
शिवसेना-भाजपा सत्तेत एकत्र असली तरी सध्या त्यांच्यात काहीही अलबेल नसल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार स्वबळाची हाक दिली जात आहे. तरीही युतीसाठी शहा यांच्यासह राज्यातील भाजपा नेते प्रयत्नशील आहेत. आता निवडणुका जवळ आल्यानं युती लवकरात लवकर होणं गरजेचं असल्याने शिवसेनेची मनधरणी करून वैतागलेल्या भाजपाने थेट अल्टीमेट देत शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा-