भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

उत्तराखंडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी (७७) यांची महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी ५ सप्टेंबर रोजी आपला पदभार स्वीकारतील.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपुष्टात आला. त्यांनी ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील राज्यपाल पदासाठी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र त्यांच्या ऐवजी कोश्यारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगण या राज्यांतही नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  

  • जन्म १७ जून १९४२
  • १९७७ मध्ये आणीबाणीदरम्यान तुरूंगवास
  • उत्तराखंडमधील भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष
  • २००१ ते २००२ मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री
  • २००२ ते २००७ दरम्यान उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते 
  • २००८ ते २०१४ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. 


हेही वाचा-

भाजपाने दरवाजे उघडल्यास विरोधकांमध्ये पवारांशिवाय कुणीही उरणार नाही- शहा

अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागले


पुढील बातमी
इतर बातम्या