Advertisement

अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपा तसंच शिवसेनेत दाखल होत असल्याने पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. यामुळे वरवर शांत दिसणारे शरद पवार आतून कमालिचे अस्वस्थ झाले आहेत.

अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागले
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपा तसंच शिवसेनेत दाखल होत असल्याने पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. यामुळे वरवर शांत दिसणारे शरद पवार आतून कमालिचे अस्वस्थ झाले आहेत. याचाच प्रत्यय अहमदनगरमधील एका पत्रकार परिषदेत आला. एका पत्रकाराने पवार यांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधल्यावर पवार चांगलेच संतापले आणि पत्रकार परिषद सोडून चालू लागले. पण उपस्थित नेत्यांनी त्यांचा राग शांत केल्यावर ते पुन्हा जागेवर येऊन बसले.  

नेमकं काय झालं?

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अनेक नेते पक्ष सोडून जात असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, विकासाची वाट धरुन आम्ही राष्ट्रवादी सोडत असल्याचं हे नेते म्हणत आहेत. परंतु इतकी वर्षे त्यांचा विकास राष्ट्रवादीमध्ये असतानाच झाल्याचं ते सोयीस्कररित्या विसरले आहेत. सेना-भाजपाने त्यांना विकासाची नेमकी कोणती वाट दाखवलीय हे मात्र कळू शकलेलं नाही. असाही टोलाही पवार यांनी लगावला. 

नातेवाईकाचा सबंध काय?

परंतु पुढं तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटील देखील पक्ष सोहताहेत, असा उल्लेख पत्रकाराने करताच शरद पवार भडकले. इथं नातेवाईकांचा काय संबंध? तुम्ही चुकीचं बोलत आहात, असं बोलणार असाल तर मला या पत्रकार परिषदेला बोलवायचं कशाला ? माफी मागा असं म्हणत पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. इतक्यात त्यांना इतर सहकाऱ्यांनी बसवलं. 

मात्र, कितीही छेडलं तरी पत्रकारांच्या प्रश्नांना शांतचित्ताने उत्तर देणारे पवार  भडकल्याचं पाहून उपस्थित सर्वच आश्चर्यचकीत झाले.हेही वाचा-

भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?

राणेंच्या पक्षाचं होणार भाजपात विलिनीकरण!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा