Advertisement

भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एक एक करून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा-शिवसेनेत दाखल होत असताना, लवकरच भाजपाकडून पुन्हा एकदा मेगाभरतीचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे.

भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?
SHARES

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एक एक करून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा-शिवसेनेत दाखल होत असताना, लवकरच भाजपाकडून पुन्हा एकदा मेगाभरतीचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. या मेगाभरतीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे नेते राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार धनंजय महाडीक, काँग्रेस आमदार जयकुमार गोरे भाजपाचा झेंडा हाती घेतली, असं म्हटलं जात आहे.

भाजपाच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेची सांगता सोलापूरला १ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित होणाऱ्या सोहळ्यात ही मेगाभरती होण्याची शक्यता आहे. 

कुणाचा समावेश?

राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत पाटील यांना उस्मानाबादमधून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून ते भाजपाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात होतं. राष्ट्रवादीच्या यात्रेलाही ते गैरहजर होते. ३१ ऑगस्टला ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

भूमिका जाहीर करणार

धनंजय महाडिक यांनीही भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून लवकरच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. तर, नारायण राणे यांनीही आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचेच आणखी एक नेते भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे.

आणखी नेते तयार 

शिवाय काही नेत्यांची वरीष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याने भाजपाच्या पुढच्या मेगाभरतीत म्हणजेच ५ किंवा १० सप्टेंबरला सोलापूरमधील काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, सांगलीतील नेते सत्यजित देशमुख भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा-

मुंबईतील ‘हे’ ३ आमदार कामगिरीत सर्वोत्तम, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल सादर

अवधूत तटकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा