Advertisement

मुंबईतील ‘हे’ ३ आमदार कामगिरीत सर्वोत्तम, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल सादर

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईतील ३६ आमदारांमधून अमिन पटेल (काँग्रेस), सुनील प्रभू (शिवसेना) आणि अस्लम शेख (काँग्रेस) हे आमदार अव्वल ठरले आहेत.

मुंबईतील ‘हे’ ३ आमदार कामगिरीत सर्वोत्तम, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल सादर
SHARES

विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना प्रजा फाऊंडेशनने (Praja Foundation Report card) २०१४ ते २०१९ या कार्यकाळात उत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या कामगिरीचा एक अहवाल नुकताच सादर केला आहे. या अहवालानुसार मुंबईतील ३६ आमदारांमधून अमिन पटेल (काँग्रेस), सुनील प्रभू (शिवसेना) आणि अस्लम शेख (काँग्रेस) हे आमदार अव्वल ठरले आहेत. 

इतके गुण

या आमदारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे १०० पैकी गुण देण्यात आले आहेत. त्यानुसार काँग्रेसचे अमिन पटेल ७९.५८ % गुणांसहीत पहिल्या, शिवसेनेचे सुनील प्रभू ७६.८७% गुणांसहीत दुसऱ्या, तर काँग्रेसचे अस्लम शेख ७५.१२ % गुणांसहीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

पक्षनिहाय गुण

पक्षनिहाय गुणांचा विचार केल्यास यातही काँग्रेसच्या आमदारांचीच कामगिरी चांगली झाल्याचं प्रजा फाऊंडेशनने नमूद केलं आहे.

या अहवालानुसार काँग्रेसच्या ५आमदारांना ७५ % गुण असल्याने काँग्रेस पहिल्या स्थानावर. भाजपाच्या १२ आमदारांना ६५% गुण असल्या भाजपा दुसऱ्या, तर शिवसेनेच्या १३ आमदारांना ६० % गुण असल्याने शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भ्रष्टाचार कमी

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मागील ५ वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण देखील घटलं आहे. मुंबईतील ३६ आमदारांपैकी १३ आमदारांवर एकाही गुन्ह्याची नोंद नाही. तर भ्रष्टाचाराचं प्रमाण ३८ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांवर आलं आहे. 

प्रजा फाऊंडेशनच्या या अहवालाचा किती आमदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत फायद होईल, हे निवडणुकांनंतरच कळेल.



हेही वाचा-

स्वाभिमान पक्षाचे नते नारायण राणे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार

अवधूत तटकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा