अवधूत तटकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरूवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे अवधूत यांनी भेटीनंतर सां

अवधूत तटकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरूवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे अवधूत यांनी भेटीनंतर सांगितलं. तटकरे ३ सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे.

कन्येला तिकीट? 

याआधी सुनील तटकरे शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. परंतु आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केल्यावर या चर्चा थांबल्या. सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता असल्याने अवधूत तटकरे शिवसेनेत उडी घेतील असं म्हटलं जात आहे.

 राजकीय वाद

तटकरे कुटुंबातील राजकीय वाद नवीन नाही. याआधी रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप तटकरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे आग्रही होते. परंतु संदीप तटकरे यांच्या ऐवजी सुनील तटकरे यांचे व्याही संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. यावरून तटकरे कुटुंबात राजकीय नाट्याला सुरूवात झाली. त्यानंतर संदीप तटकरे यांनी शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत पोटफोडे जिंकले होते, तर तटकरे तिसऱ्या क्रमांकावर होते.

त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्ती करत दोन्ही कुटुंबात समेट घडवून आणल्याचं म्हटलं जात होतं. परंतु उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून तरी तसं दिसून येत नाही. 

 


हेही वाचा-

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत

राष्ट्रवादीचं ‘भुज’बळ जाणार? सुप्रिया सुळेंच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चासंबंधित विषय