“संजय राऊत महाराष्ट्रात शिवसेनेची अवस्था बिहारसारखी करतील”

संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहेत, तोपर्यंत विरोधकांना भीती नाही. कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात संजय राऊत करतील, असं म्हणत बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

मंगळवारी उशीरा रात्री बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत जेडीयू आणि भाजपच्या एनडीएला १२५ निसटतं बहुमत मिळालं असून आरजेडी आणि काँग्रेसच्या महाआघाडीने जोरदार टक्कर देत ११० जागा मिळवल्या. परंतु या निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेचा पुरता धुव्वा उडाला आहे. शिवसेना उमेदवारांना बहुतेक ठिकाणी नोटापेक्षाही कमी मतं मिळाली असून अनेकांचं डिपाॅझिटही जप्त झालं आहे. 

हेही वाचा- विनाकारण तुतारीची लाज काढली.., भाजपची शिवसेनेवर खोचक टीका

यावरून शिवसेनेची टर उडवताना निलेश राणे यांनी नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेना उमेदवारांची यादीच दिली आहे. सोबत बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी, असा टोमणा मारला आहे. बेनीपूर: शिवसेना ४६९ मते, नोटाला २१४५, राघोपूर: शिवसेना-३०, नोटा-३१०, गया: शिवसेना-२१ मते, नोटा-७९, मधुबनी: शिवसेना-६३, नोटा-२२२, नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-५० 

वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

सोबतच राहुल गांधींना राजकारणात बरंच शिकावं लागेल. BJP समोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, MP, UP, कर्नाटका निवडणुकीने दाखवून दिलं. राहुल गांधींच्या नेहमीच्या १५ मिनिटांच्या भाषणामध्ये १२ मिनिटं फक्त मोदी साहेबांची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही, असं म्हणत राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे.

(bjp leader nilesh rane criticises shiv sena mp sanjay raut after bihar assembly election result)

हेही वाचा- बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा, ‘नोटा’पेक्षाही कमी मतं
पुढील बातमी
इतर बातम्या