Advertisement

बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा, ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे.

बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा, ‘नोटा’पेक्षाही कमी मतं
SHARES

भाजप आणि नितीश कुमार यांना आव्हान देत बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या शिवसेनेचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. शिवसेना उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली असून अनेकांचं तर डिपाॅझिटही जप्त झालं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार १० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. एकूण २४३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत (bjp) भाजप-संयुक्त जनता दल यांच्या ‘एनडीए’ने स्पष्ट आघाडी घेतली असून राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांची महाआघाडी पिछाडीवर पडली आहे. मात्र, बिहार निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. 

शिवसेनेने (shiv sena) या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. एवढंच नाही, तर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षा देखील कमी मते मिळाली आहे.  

निवडणूक आयोगाने दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार बिहार निवडणुकीत शिवसेनेला अवघी ०.०५ टक्के मते मिळाली आहेत, तर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा जास्त तर नोटाला १. ७४ टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसलाही बिहारमध्ये फरसं यश मिळालं नाही. त्यांना केवळ शिवसेनेहून अधिक ०. २३ टक्के मते मिळाली आहेत.  

नितीश कुमार यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. परंतु, शिवसेनेने या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्यानं शिवसेनेला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं होतं. परंतु तुतारीला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलं.

(shiv sena candidates get low votes than nota in bihar assembly election 2020)


हेही वाचा-

महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळून लावला- उद्धव ठाकरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा