Advertisement

महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळून लावला- उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल, परंतु मी माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या जनतेचं हित जपणारच, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळून लावला- उद्धव ठाकरे
SHARES

महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्याच्या बदनामीचं कारस्थान केलं होतं ते तोडून-मोडून काढत आपण जूनमध्ये १७००० कोटींचे सामंजस्य करार केले आणि मला त्याचा अभिमान आहे. मुंबईकरांच्या हितासाठी सुविधांची उभारणी करताना मिठाचा खडा टाकणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ. महाराष्ट्राच्या हितासाठी टीका झाली तरी चालेल; परंतु मी माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या जनतेचं हित जपणारच, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी जनतेशी साधलेल्या संवादात भाजपचं (bjp) नाव न घेताच इशारा दिला.

बाॅलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन पाठोपाठ कांजूरमार्ग कारशेडवरून (metro car shed) राज्य सरकारवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका होत आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलं. ते म्हणाले, आपण सगळे कोरोनाशी लढा देत असताना त्यांनी महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून इथं अंमली पदार्थांची शेती होत असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं. मात्र आपण त्यांचं कारस्थान उधळून लावलं. 

हेही वाचा- दिवाळीनंतर शाळा होणार सुरू, उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

तसंच कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे, असं काहीजण म्हणत आहेत. असं म्हणणाऱ्यांना एक कळत नाही की ते मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकत आहेत. आरेची कारशेड (aarey car shed) कांजूरमार्गला का नेली याची सर्व उत्तरं आपल्याकडे आहेत. त्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ. मिठाच्या खड्याचा इलाज काय करायचा तो करू, पण आम्हीसुद्धा डोळे बंद करून काम करत नाही. जे मुंबईकरांच्या हितााचं असेल, ते टीकेची पर्वा न करता करणारच. महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल, परंतु मी माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या जनतेचं हित जपणारच, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

शिवाय दोन दिवसांपूर्वी मेट्रोसाठी आपण जर्मनीच्या KFW कडून जवळपास ५४५ दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक व्याजदरात घेतलं आहे, अशी माहिती देताना महाराष्ट्रात गुंतवणूक करताना खूप आश्वासक वाटत असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार देत असल्याचं उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा