Advertisement

म्हणून मराठी सिनेमाच्या राखीव ‘शो’साठी सरकार आग्रही- उद्धव ठाकरे

मराठीत उत्तम चित्रपट बनत असूनही त्यांना पुरेशा प्रमाणात शो मिळत नसल्याने राज्य सरकार राखीव शो बाबत आग्रही असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

म्हणून मराठी सिनेमाच्या राखीव ‘शो’साठी सरकार आग्रही- उद्धव ठाकरे
SHARES

महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सोबतच मराठीत (marathi films) उत्तम चित्रपट बनत असूनही त्यांना पुरेशा प्रमाणात शो मिळत नसल्याने राज्य सरकार राखीव शो बाबत आग्रही असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर आयोजित ३ दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्याला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह मुख्य सचिव संजय कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, निर्माते सिध्दार्थ रॉय कपूर, टी.पी.अग्रवाल. अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा असल्याचं म्हटलं जातं. कारण समाजात घडणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळतं. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील कलाकारांच्या पाठिशी राज्य शासन कायम उभे असून कलाकारांना बळ देण्याचं काम करण्यात येईल.

हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असल्याचं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिलं आहे. या अनुषंगाने चित्रपट, मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण असावे या मुख्य उद्देशातूनच तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचा उद्देश या क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान बळकट करणे, राज्यात चित्रपट निर्मिती आणि मनोरंजन माध्यम केंद्र प्रस्थापित करणे आणि या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे असा असणार आहे.  

(maharashtra government will support for affordable theaters says cm uddhav thackeray)

 हेही वाचा- विनयभंगाच्या आरोपानंतर कौवा बिर्यानी फेम विजय राजची चित्रपटातून हकालपट्टी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा