Advertisement

विनयभंगाच्या आरोपानंतर कौवा बिर्यानी फेम विजय राजची चित्रपटातून हकालपट्टी

आरोपानंतर आता विजय राजची विद्या बालनीची प्रमुख भूमिका असलेल्या 'शेरनी' या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

विनयभंगाच्या आरोपानंतर कौवा बिर्यानी फेम विजय राजची चित्रपटातून हकालपट्टी
SHARES

बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता विजय राजला विनयभंगाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली होती. चित्रपटाच्या सेटवर एका महिला सहकलाकाराची छेड काढण्याचा त्याच्यावर आरोप आहे. या आरोपानंतर आता विजय राजची विद्या बालनीची प्रमुख भूमिका असलेल्या 'शेरनी' या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

विजय राजला चित्रपटातून काढल्यानं निर्मात्याला प्रत्येक दिवशी २० लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. विजय राज चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलपासून टीमसोबत होता. एकूण दोन कोटींचं नुकसान निर्मात्यांना होणं निश्चित आहे.

निर्मात्यांना आता चित्रपट रिशूट करावा लागणार आहे. म्हणजेच विद्या बालन आणि इतर कलाकारांना सर्व सीन रिक्रिएट करावे लागतील. एकुण २२ दिवसांच्या चित्रीकरणात विजय राजचा सहभाग होता. निर्मात्यांना कुठलाही वाद नकोय, त्यामुळे त्यांनी तडकाफडकी विजय राजची चित्रपटातून गच्छंती केली. आता त्याच्या जागी नवीन कलाकाराला कास्ट केलं जाईल.

विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शेरनी’ चित्रपटाचं चित्रीकरण सध्या मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे. शूटिंगसाठी विजय राजसह संपूर्ण टीम गोंदियात आली होती. ती हॉटेल गेटवेमध्ये थांबली होती. सेटवर चित्रीकरण सुरू असताना विजय राजनं आपला विनयभंग केल्याचा आरोप ३० वर्षीय महिला कलाकारानं केला होता.

सेटवर विजय राजने पीडितेच्या खांद्यावर हात ठेवला होता. यामागील आपला हेतू चुकीचा नव्हता असं विजय राजनं म्हटलं आहे. पीडितेच्या वयाची आपली मुलगी असल्याचं त्यानं सांगितलं. आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत असं करण्याचा विचार करू शकत नाही, असंही तो म्हणाला. पीडितेची विजय राजनं माफी मागितली, मात्र पीडिता त्याला माफ करू शकली नाही.

'रन' या चित्रपटामधील 'कौवा बिर्याणी' सीनसाठी विजय राज खूप लोकप्रिय झाला होता. धमाल, वेलकम, दीवाने हुए पागल, रघु रोमियो, मुंबई एक्स्प्रेस, बॉम्बे टू गोवा आणि मान्सून वेडिंग हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.



हेही वाचा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

कंगनाच्या अडचणीत वाढ, जावेद अख्तर यांनी घेतली कोर्टात धाव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा