Advertisement

विनाकारण तुतारीची लाज काढली.., भाजपची शिवसेनेवर खोचक टीका

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली असून अनेकांचं तर डिपाॅझिटही जप्त झालं आहे. यावरून आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवायला सुरूवात केली आहे.

विनाकारण तुतारीची लाज काढली.., भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
SHARES

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली असून अनेकांचं तर डिपाॅझिटही जप्त झालं आहे. यावरून आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवायला सुरूवात केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी तर ‘विनाकारण तुतारीची लाज काढली’, असं म्हणत शिवसेनेची टर उडवली आहे.

बिहारमध्ये सोनिया सेनेला NOTA पेक्षा कमी मते… निवडणूक चिन्ह म्हणून बिस्किटच बरे होते. विनाकारण तुतारीची लाज काढली.. असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 

तर दुसऱ्या बाजूला भाजप आमदार नितेश राणे यांनी बिहार देवेंद्र फडणवीस यांनी आणलं..

आता.. महाराष्ट्रला पण देवेंद्रजीच पाहिजे.. पुन्हा येणार..येणारच!!! अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नितीश कुमार यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. परंतु, शिवसेनेने या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्यानं शिवसेनेला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं होतं. परंतु तुतारीला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलं.

हेही वाचा- बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा, ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार १० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. एकूण २४३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दल यांच्या ‘एनडीए’ने स्पष्ट आघाडी घेतली असून राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांची महाआघाडी पिछाडीवर पडली आहे. मात्र, बिहार निवडणुकीत शिवसेनेला (shiv sena) अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. 

शिवसेनेने या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. एवढंच नाही, तर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षा देखील कमी मते मिळाली आहे.  

निवडणूक आयोगाने दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार बिहार निवडणुकीत शिवसेनेला अवघी ०.०५ टक्के मते मिळाली आहेत, तर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा जास्त तर नोटाला १. ७४ टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसलाही बिहारमध्ये फरसं यश मिळालं नाही. त्यांना केवळ शिवसेनेहून अधिक ०. २३ टक्के मते मिळाली आहेत. 

(bjp mla atul bhatkhalkar criticised shiv sena after bihar assembly election result)

हेही वाचा- यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा