मुंबईचे ठाकरे फाकरे माझं काय करू शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून काय करणार?

मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार आहे? अशा शब्दांत भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांना टाेला लगावला आहे. मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी ठाकरे सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेऊन निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी हे भाष्य केलं.

मागील काही दिवसांपासून रोहीत पवार आणि निलेश राणे यांची सोशल मीडियावर वादावादी सुरू आहे. त्यावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार आहे. आमच्या नादी लागू नका, हे घरी बसून फक्त फेसबुक लाइव्ह करु शकतात.

तर, शिवसेनेला उद्देशून राणे म्हणाले, शिवसेना फारतर हॅशटॅग आंदोलन करु शकतं. कारण ते बोटे दाबण्यात पटाईत आहेत. लोकं त्यांना शिव्या घालत आहेत. पण हॅशटॅग करुन लोकांची मने जिंकता येत नाहीत,हे सुद्ध त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

हेही वाचा - प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे मी काय महाराष्ट्र पण लक्ष देत नाही- निलेश राणे

साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा?? असा प्रश्न निलेश राणे यांनी ट्विटरवरून उपस्थित केला होता. 

त्याला मी आपणास सांगू इच्छितो की अजित पवार यांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी. आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन  करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो, असं उत्तर दिलं होतं. 

त्यावर संतापलेल्या निलेश राणे यांनी गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत असतं तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय... ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलाल नाही.

बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तुला, अशा शब्दांत दटावलं होतं.

हेही वाचा - मनसेला धक्का! कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतला राजकीय संन्यास

पुढील बातमी
इतर बातम्या