Advertisement

मनसेला धक्का! कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतला राजकीय संन्यास

सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे.

मनसेला धक्का! कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतला राजकीय संन्यास
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते (mns) आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (harshvardhan jadhav) यांनी शनिवार २३ मे रोजी अचानकपणे राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. मात्र स्वत: राजकारणातून निवृत्त (retirement from politics) होत असताना त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव (sanjana jadhav) यांच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

दोन वेळा कन्नडचे आमदार राहिलेले हर्षवर्धन जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई (son in low of raosaheb danve) आहेत. मागील काही काळात राजकीय आणि कौटुंबिक वादविवादामुळे हर्षवर्धन जाधव चर्चेत होते. जाधव यांच्या राजकीय संन्यासामागे कौटुंबिक वाद कारण असल्याचं म्हटलं जात आहे. जाधव यांनी व्हिडिओमध्ये त्याच्या कबुली देखील दिली आहे.

हेही वाचा - अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट, केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

हर्षवर्धन जाधव यांनी निवृत्ती जाहीर करताना व्हिडिओत सांगितलं की, लॉकडाऊन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो”.

'प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. तशा आमच्याही घरात झाल्या. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. मी संजनाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राचे नेते रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चितच उत्तुंग भरारी घेईल. त्यामुळे आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा,' असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा - लज्जास्पद! कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा जगातला एकमेव पक्ष, आदित्य ठाकरेंनी भाजपला सुनावलं


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा