अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट, केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

अमित ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली तसंच कोरोना उपचारासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या.

अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट, केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
SHARES

बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका यांच्या वेतन कपातीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शासकीय निवासस्थानी शुक्रवार २२ मे २०२० रोजी भेट घेतली. या बैठकीत अमित ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली तसंच कोरोना उपचारासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हे विषय मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांना दिलं.

मुंबईत भयानक स्थिती

शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे १७५१ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २७ हजार ०६८ इतकी झाली आहे. मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१ रुग्ण दगावले आहेत. त्याआधी १६ मे रोजी ४१ जण दगावले होते, तर १७ मे रोजी ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

हेही वाचा - अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना काही सूचना केल्या. यामध्ये 

  • करोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी ह्यासाठी एक Application Software विकसित करावं. 
  • बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका ह्यांची वेतनकपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा.
  • प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायला हवी. 
  • प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत आणि त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा.

या सूचनांचा समावेश आहे. या सूचनांवर आरोग्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

याआधी अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून बंधपत्रीत डाॅक्टर आणि नर्सेसच्या (doctors and nurses on bond) मानधनात कपात करण्याऐवजी अधिक भत्ता देऊन त्यांच्या परिश्रमाचं मोल केलं पाहिजे, अशी विनंती केली होती. 

हेही वाचा - चक्क ‘या’ वस्तूंच्या पाकिटावरही आदित्य ठाकरेंचा फोटो, शिवसेनेच्या जाहीरातबाजीवर मनसेची टीका

संबंधित विषय