Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

बंधपत्रित डाॅक्टर आणि परिचारिकांना पूर्वीइतकंच मानधन देण्याची कार्यवाही करावी. अन्यथा कोरोनाविरुद्ध लढणारे डाॅक्टर आणि नर्स हे योद्धे आहेत. या आपल्या विधानाला काहीही अर्थ उरणार नाही, असं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
SHARES

कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्या मानधनातील कपातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (mns leader amit thackeray) यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी बंधपत्रीत डाॅक्टर आणि नर्सेसच्या (doctors and nurses on bond) मानधनात कपात करण्याऐवजी अधिक भत्ता देऊन त्यांच्या परिश्रमाचं मोल केलं पाहिजे, अशी विनंती केली आहे. 

मानधात कपात कशी?

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य सेवा (maharashtra health department) आयुक्तलयानं २० एप्रिल रोजी एक परिपत्रक काढलं होतं. त्यानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मासिक मानधन ५५ हजार आणि ६० हजार (monthly salary) असं कंत्राटी सेवेच्या निकषावर निश्चित करण्यात आलं आहे. त्याआधी वेतन आणि भत्ते मिळून या वैद्यकीय अधिकाऱ्यांना  ७८ हजार इतकं मानधन मिळत होतं. या अर्थाने त्यांच्या मानधनात २० हजार रुपयांची कपात झाली आहे. 

बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. याआधी त्यांना ३५ हजार रुपये इतकं एकत्रित मानधन मिळत होतं. परंतु नव्या आदेशानुसार त्यांचं मानधन १० हजार रुपयांनी घटून २५ हजार रुपयांवर आलं आहे. डॉक्टर आणि परिचारिकांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन नियम, वाचा...


मानधन दुप्पट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस ही पदवी संपादन करणाऱ्या या डाॅक्टरांना बंधपत्रानुसार शासनाला एक वर्षांची सेवा देणं अनिवार्य आहे. त्यानुसार विविध शासकीय रुग्णालयांमध्ये बंधपत्र वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. सध्याच्या कोरोनाविरुद्धच्या संकटात हे डाॅक्टर मोलाची कामगिरी करत आहेत. कोरोनाच्या काळात डाॅक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने नुकताच घेतला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून एवढ्या उदारपणाची अपेक्षा नसली, तरी त्यांच्या मानधनात कपात होणार नाही, याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे. नर्सेसवर देखील अन्याय होत आहे, याबद्दल शंका नाही.

अन्यथा विधानाला अर्थ नाही

त्यामुळे बंधपत्रित डाॅक्टर आणि परिचारिकांना पूर्वीइतकंच मानधन देण्याची कार्यवाही करावी. अन्यथा कोरोनाविरुद्ध लढणारे डाॅक्टर आणि नर्स हे योद्धे आहेत. या आपल्या विधानाला काहीही अर्थ उरणार नाही, असं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा