Advertisement

३ मेडिकल कॉलेजमधील ७३ डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुंबई महापालिकेच्या ३ मेडिकल कॉलेजमधील ७३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सायन, के.ई.एम. आणि नायर रुग्णालयातील डॉक्टरांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

३ मेडिकल कॉलेजमधील ७३ डॉक्टरांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून, रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. या कोरोनानं मुंबईकरांना चांगलंच टार्गेच केलं आहे, तसंच, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या ३ मेडिकल कॉलेजमधील ७३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सायन, के.ई.एम. आणि नायर रुग्णालयातील डॉक्टरांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

या ३ रुग्णालयांपैकी सायन रुग्णालयात सर्वाधिक म्हणजे ४२ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, अधिक प्रमाणात पीपीई किट उपलब्ध होत असल्यानं कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण घटलं आहे. तसंच, पोषण व उपचार व्यवस्थित देणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मंगळवारी पश्चिम उपनगरातील सहाय्यक पोलिस आयुक्तांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याचप्रमाणं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कांदिवली (पू) येथील समता नगर पोलिस ठाण्यात संलग्न असलेल्या ३ अधिकाऱ्यांचीही सकारात्मक चाचणी करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली असून, मुंबईतही २२ हजारांचा (२२,५५३) आकडा पार केला आहे. मंगळवार १९ मे रोजी दिवसभरात २१२७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. सोबतच राज्यात मंगळवारी १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.



हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा