मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आदित्य ठाकरेंना आव्हान

लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना दिलं आहे. सोबतच कारशेडच्या (metro car shed) प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या ५० हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काँग्रेस सोबत करताय की काय? असा प्रश्न देखील शेलार यांनी विचारला आहे.

यावर बोलताना आशिष शेलार (ashish shelar) म्हणाले, आपल्याला नाकारता येणार नाही की बाफणा नावाच्या एका व्यक्तीने सर्व्हे क्रमांक २५८ अ वर ज्या ठिकाणी कांजूरमार्गला आपण मेट्रो कारशेड प्रस्तावित केलं आहे, त्याबाबत रिट पिटीशन फाईल केली आहे. जानेवारी १९९७ मध्ये त्याच्यावर स्टे आॅर्डर आलीय. या सगळ्याबाबत संदिग्धदा आहे, असं १ आॅक्टोबर २०२० ला जिल्हाधिकारी स्वत: म्हणताहेत. त्यावर उपाय म्हणून केवळ महाधिवक्त्यांचं मत विचारात घेऊन आपण एवढी मोठी जागा हस्तांतरीत करण्याचा जो निर्णय घेतला त्याची वैधता प्रश्नांकीत आहे, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

हेही वाचा- मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क

केवळ तेवढंच नाही, ४ वेगवेगळ्या केस सिटी सिव्हिल कोर्टापासून हायकोर्टापर्यंत प्रलंबित आहेत, हे जनतेपासून का लपवलत? सरकारच्या घोषणेआधी २२ सप्टेंबरला केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता, तरीही ही गोष्ट जनतेपासून का लपवली? या सगळ्यातून एक मोठा घोटाळा समोर येण्याचं चित्र आहे. ५० हजार कोटी रुपयांची जागा साॅल्ट पॅन लँड (salt pan land) कमिशनरच्या परवानगीविना जर द्यायला लागले, तर त्या ठिकाणच्या सर्व जागा विकासकांना आणि मालकांना देण्याच्या पायाभरणीचं पाप हे आपण का करता, असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला.

या मुंबईत आम्ही पाहिलंय की ज्या काँग्रेससोबत तुम्ही सत्ता स्थापन केलीय, त्या काँग्रेसने गिरणीच्या आणि गिरणी कामगारांच्या जागा अशाच बिल्डरांना दिल्या. त्याचपद्धतीने या ५० हजार कोटी रुपयांची ही जागा देखील खासगी विकासकांना देण्याचा घाट घातला जातोय, त्यावर आदित्य ठाकरेंनी कुठल्याही व्यासपीठावर आमच्यासोबत चर्चा करावी, असं आमचं त्यांना आव्हान आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

(bjp mla ashish shelar challenge environment minister aaditya thackeray for debate on metro car shed kanjurmarg land)

हेही वाचा- भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचाय- नवाब मलिक
पुढील बातमी
इतर बातम्या