विकासाची हंडी फोडून सोमय्यांचा विरोधकांवर निशाणा

राजकारणात वावरताना स्वतःच्या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम आणि उत्सवांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या संपर्कात राहण्याची कला खासदार किरीट सोमय्या यांना चांगलीच साध्य झाली आहे. एरवी भ्रष्टाचाराची हंडी फोडणाऱ्या किरीट सोमय्या यांनी यंदा विकासाची हंडी फोडली. भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून स्वतःच्या मतदारसंघात हिरीरीने दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या किरीट सोमय्या यांनी यानिमित्ताने इतर विरोधकांसोबतच शिवसेनेलाही डिवचण्याची संधी साधली. भांडुपमध्ये आयोजित केलेल्या या दहीहंडी वेळी सोमय्या यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विकास होत असल्याचा दावा केला.

विकासाचा नवा अध्याय लवकरच लिहिला जाणार असल्याचा दावा करत किरीट सोमय्या यांनी याप्रसंगी मुंबईत वर्षभरात मेट्रोचे नवे प्रकल्प उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. किरीट यांच्यासोबत त्यांचेे नगरसेवक पुत्र नील सोमय्यादेखील या विकासाच्या हंडीत सहभागी झाले. 

पुढच्या वर्षी 15 ऑगस्टपर्यंत मुंबईत विविध ठिकाणी जवळपास एक लाख कोटी किमतीचे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झालेले असेल. त्यात घाटकोपर ते मुलुंड या मार्गाचा समावेश असेल. मुंबई महानगर पालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीचे आमचे काम असेल.

किरीट सोमय्या, खासदार, भाजपा


हेही वाचा - 

किरीट सोमय्यांचा आनंद गगनात मावेना


पुढील बातमी
इतर बातम्या