SHARE

मुलुंड - 'महानगरपालिकेमधून माफियाराज बाहेर काढताना आवाज बसला तरी त्यांनाच घरी बसवू' अशी टीका करत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं.

गोरेगावच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा बसला होता. त्यावर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून 'आज आवाज बसला आहे, उद्या तुम्हीच घरी बसाल' अशी खरपूस टीका करण्यात आली होती. याचाच समाचार सोमवारी किरीट सोमय्या यांनी घेतला.
या वेळी सोमय्या यांनी मुलुंडमधलं डम्पिंग ग्राउंड बंद का नाही केलं? असा प्रश्नही शिवसेनेला विचारला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी 'लवकरच महानगरपालिकेच्या घोटाळ्यांचा ब्लॅकपेपर प्रसिद्ध करू' असेही सांगितले. 'भाजपा मुलुंड आणि देवनारमधील डम्पिंग ग्राउंड बंद करणारच' असे आश्वासनही सोमय्या यांनी या वेळी दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या