खराब रस्त्यांनी ठाणेकर बेहाल, शिवसेनेविरोधात भाजपाचं आंदोलन

दिवा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षानं नुकताच ठाणे महानगरपालिका (TMC) आणि शिवसेनेच्या विरोधात निषेध नोंदवला. ठाणे भाजप प्रमुख निरंजन डावखरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी टीएमसीची सत्ता असलेल्या शिव सीनविरोधात निषेध नोंदवला.

दिवामधील वेगवेगळ्या ठिकाणी हा निषेध करण्यात आला. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याबद्दल टीएमसीविरोधात निषेध करण्यासाठी निदर्शक एकत्र जमले. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भाजपमधील एका सदस्यानं सांगितलं की दिवामध्ये खराब रस्त्यांमुळे लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

दिवामध्ये पाण्याची समस्या आहेच. शिवाय रस्त्यांच्या सुविधांचा अभाव असल्याचं भाजपमधील एका सदस्यानं म्हटलं. आहे. “शिवसेनेने आश्वासन दिले पण विकास झाला नाही. दिवाला नेहमीच सावत्र मुलाप्रमाणे वागणूक दिली जाते, असं रोमानदास मुंडे यांनी सांगितलं.

यापूर्वी ठाणे महानगरपालिकेनं रस्ता दुरुस्तीच्या कामांसाठी निधी मंजूर केला होता. तथापि, आतापर्यंत काहीही झाले नाही. दरम्यान, टीएमसीचे आयुक्त संदिप मालवी यांनी कोरोना व्हायरसच्या कामात व्यस्त असल्याचं सांगितलं. पण लवकरच मी भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या रस्त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करेनं, असं देखील स्पष्ट केलं.  


हेही वाचा

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केली कारोनावर मात

रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल- देवेंद्र फडणवीस

पुढील बातमी
इतर बातम्या