...अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू होईल, भाजपचा शिवसेनेला इशारा

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही शिवसेना आणि भाजपामधील सत्ता वाटपाचा पेच सुटलेला नाही. शिवसेना समसमान सत्ता वाटपावर अडून बसली आहे. त्यामुळे अखेरीस भाजपाने शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं भाजपाने म्हटलं आहे. यावर शिवसेना काय निर्णय घेते हे आता महत्त्वाचं ठरणार आहे. 

शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र, भाजपाने मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती देण्यास नकार दिल्याने महायुतीतील सत्ता संघर्ष चांगलाच चिघळला आहे. दोन्ही आक्रमक झाले आहेत. कोणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं पेच अधिकच वाढला आहे. शिवसेना एेकत नसल्याने अखेर भाजपाने राष्ट्रपती राजवटीचं अस्त्र बाहेर काढलं

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असं म्हटलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता भाजपच्याच हातात राहणार आहे. त्यामुळे आता शिवसेना यातून कसा मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा -

शिवसेनेला पाठिंबा देण्यास सुशीलकुमार शिंदेंचा विरोध

शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदात वाटा मागितल्यामुळेच तिढा - मुनगंटीवार


पुढील बातमी
इतर बातम्या