कोरोना मृत्यू रोखणं मोठं आव्हान, मुख्यमंत्र्यांची खासगी हाॅस्पिटल्सच्या सीईओंशी चर्चा

कोरोनाची लागण (coronavirus) झालेल्या रुग्णांवरची उपचार पद्धती तसंच गंभीर अवस्थेतील रुग्णांना कसं वाचवायचं या व अशा इतर वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील प्रमुख कॉर्पोरेट (private hospitals) रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली. यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे डॉक्टर्सदेखील सहभागी होते. 

झूम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सैफी, फोर्टिस, वोकहार्ट, हिंदुजा, हिरानंदानी,कोकिलाबेन, सेव्हन हिल्स त्याचप्रमाणे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सौरव विजय,  सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, रामास्वामी, डॉ संजय ओक आदी उपस्थित होते.  

हेही वाचा- लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या ३७०० परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं

रुग्ण व्यवस्थापन हवं

कोरोना लागण (covid-19) झालेल्या रुग्णांची देखभाल, त्यांच्यावरील उपचार हा एकूणच कोरोना साथीमधला महत्त्वाचा भाग आहे. रुग्णांना लवकर बरं करणं, मृत्यू होऊ न देणं हे सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रासमोराचं आव्हान आहे. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत उत्तम रुग्ण व्यवस्थापन झालं पाहिजं, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

डाॅक्टर्स, नर्सला जपा

उपचार सुरु असताना रुग्णांची कशा रीतीने काळजी घ्यावी, वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता, प्रमाणित उपचार पद्धती,आयसीयू बेड्सची उपलब्धता, यावर विस्तृत चर्चा झाली. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं व त्यांना बाधा होऊ नये हे सर्वात महत्त्वाचं आहे. कोविड उपचारासाठी जी तीन प्रकारची रुग्णालये निश्चित केली आहेत. त्याचं नियोजन व त्यांच्यातील समन्वय व्यवस्थित असणं गरजेचं आहे यावरही चर्चा झाली. चाचण्यांची संख्या वाढली आहे. तसंच आता लोकांमध्ये जागृती आल्याने लक्षणे दिसताच लोक रुग्णालयात येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत आपल्याला कोरोनाचा आलेख खाली आणायचा आहे. यादृष्टीने या बैठकीत विविध वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी सूचना ऐकल्या व कार्यवाहीचे निर्देश दिले.

हेही वाचा- हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द

पुढील बातमी
इतर बातम्या