Advertisement

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द

मुंबई महापालिकेतर्फे वरळी आणि धारावी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार होता.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द
SHARES
मुंबई महापालिकेतर्फे  वरळी आणि धारावी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार होता. मात्र, आता पालिकेने एका दिवसातच हा निर्णय मागे घेतला आहे. हृदयासंबंधीच्या धोक्याचं कारण सांगत पालिकेने हा निर्णय रद्द केला.  



वरळी, लोअर परेल, धारावी, दादर ही ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार असल्याचा निर्णय  बुधवारी घेण्यात आला होता. आता हा निर्णय रद्द करत सरसकट लाखभर नागरिकांना हा डोस देण्याऐवजी आता फक्त काही जणांनाच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. 


कोरोनाची लागण न झालेल्या मात्र क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती, पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांनाच हा डोस दिला जाणार आहे. धारावीतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तींनाही हा डोस दिला जाणार आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा डोस देण्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारीच दिली होती. वरळी आणि धारावी या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या परिसरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देणार होती. 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण

लक्षणे असलेल्यांचीच होणार चाचणी, मुंबई महापालिकेचा निर्णय




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा