Advertisement

लक्षणे असलेल्यांचीच होणार चाचणी, मुंबई महापालिकेचा निर्णय

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या आणि लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

लक्षणे असलेल्यांचीच होणार चाचणी, मुंबई  महापालिकेचा निर्णय
SHARES

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या आणि लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. याबाबत मुंबई महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्यांना अलग राहण्याच्या सूचना देण्यात येतील.

मुंबईत रोज खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये 500 चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांचा प्रयोगशाळांवरील ताण वाढल्याने अहवाल येण्यास 2 ते 3 दिवस लागत आहेत. मागील 4 ते 5 दिवस रोज २०० हून अधिक रुग्णांचे नव्याने निदान होत असून त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णालयांमधील खाटांची संख्याही मर्यादित उरली आहे. परिणामी लक्षणे असलेल्या आणि अतिजोखमीच्या रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पालिकेने चाचण्यांच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमावलीनुसार, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारून त्यांना अलग राहण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या इमारती किंवा घरांमध्ये स्वतंत्र खोली किंवा शौचालयाची सुविधा उपलब्ध असेल, तेथे या व्यक्तींना घरातच अलग राहण्यास सांगितले जाईल. या व्यक्तींना लक्षणे निर्माण झाल्यास घरीच नमुने घेतली जातील. परंतु झोपडपट्टी किंवा एकाच खोलीत राहणाऱ्या व्यक्तीना उपलब्ध असलेल्या अलगीकरण ठिकाणी दाखल केले जाईल.हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण

Coronavirus Updates: लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मासेमारीला परवानगी

लॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा