Advertisement

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण

मुंबईत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या २००० च्या वर गेली आहे.

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण
SHARES

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागानं १५ एप्रिल, २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, मुंबईत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची  संख्या २००० च्या वर गेली आहे. अद्ययावत (बुधवारी) अधिका-यांनी मुंबईत एकूण २०१० घटनांची नोंद केली आहे. त्यापैकी ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आकडेवारीवरून असंही सुचवलं गेलं आहे की, महाराष्ट्र राज्यात सध्या COVID 19 च्या रूग्णांची संख्या २ हजार ९१६ वर गेली आहे. त्यापैकी ६८ टक्के रुग्ण हे राजधानीतले असून १८७ मृत्यूची नोंद झाली आहे. तर २९५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. त्याशिवाय पुण्यात ३६२, ठाण्यात १०९, नवी मुंबईत ६८ आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये ५० रुग्ण आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अहवालात असंही नमूद केलं आहे की, ५ ते १४ एप्रिल २०२० दरम्यान १०० प्रयोगशाळांमध्ये एकूण ३ हजार ९२९ नमुने तपासणी करण्यात आले. याशिवाय संशयीत प्रकरणांतून १ हजार ५४१ स्वाब नमुने घेण्यात आले. मुंबईतील एकूण प्रकरणांपैकी ८५७ प्रकरणे संपर्क ट्रेसिंग आणि कंटेंट झोनमध्ये आढळली.

केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे बीएमसी अधिकाऱ्यांन शहरातील ३३ हजार ६३६ भागात सेनिटायझेशन करण्यात आलं आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब आणि इतरांसारख्या आरोग्याच्या स्थितीत असणार्‍या लोकांना काटेकोरपणे घरीच रहाण्यास आणि औषधोपचार सुरू ठेवण्यास सांगितलं आहे. लक्षणे आढळल्यास एखाद्यानं त्वरित सहाय्यक आणि उपचारासाठी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित करतांना महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३ मे २०२० पर्यंत वाढवण्यात आल्याचं नमूद केल आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याची पुष्टी केली आणि म्हणाले की, राज्य सरकारचे अधिकारी या संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. सोशल डिसन्टसिंगचं पालन केलं तर कोरोनाव्हायरसशी लढण्यास मदत होईल.


मुंबई १८९६

कल्याण डोंबिवली ५०

नवी मुंबई ६८

ठाणे १०९

वसई विरार ३२

उल्हासनगर १

पनवेल १०

पुणे ३६२

पिंपरी ३५

पुणे ग्रामीण १०

नागपूर ५५

अहमदनगर २७

रत्नागिरी ६

औरंगाबाद २३

यवतमाळ ५

सांगली २६

सातारा ६

उस्मानाबाद ४

कोल्हापूर ६

जळगाव २

बुलढाणा २१

नाशिक ४

पालघर ५

वाशिम १

अमरावती ६

लातूर ८

हिंगोली १

जालना १

मीरा भाईंदर ५१

अकोला १३

मालेगाव ४८

बीड १

सिंधुदुर्ग १

धुळे २

भिवंडी १

रायगड ५

सोलापूर २

इतर राज्ये ११
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा