Advertisement

लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या ३७०० परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३७०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आलं आहे.

लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या ३७०० परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.  या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३७०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आलं आहे. 20 विमानांद्वारे बुधवारी या नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आलं.

लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय आणि देशातील विमानसेवा बंद आहेत. त्यामुळे लंडन, अटलांटा, पॅरिस, फ्रँकफर्ट, सिंगापूर, टोकियो आणि इतर देशाचे  ३७०० नागरिक भारतात अडकले होते. लाॅकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या परदेशी नागरिकांचा आणखी मुक्काम वाढणार होता. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या देशातील अनेक विमान कंपन्या आणि दूतावासांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २० विमान उड्डाणाद्वारे परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आलं आहे.

 परदेशी प्रवाशांना सोडताना विमानतळ आणि बोड्रिंग येथे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. यासाठी विमानतळावर प्रवेश केल्यापासून विमानात चढण्यापर्यंत विमानतळाने कठोर तपासणी प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया येणार्‍या प्रवाशांनाही तितकीच लागू असणार असल्याचं विमानतळ प्रशासनाने सांगितलं.  



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण

लक्षणे असलेल्यांचीच होणार चाचणी, मुंबई महापालिकेचा निर्णय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा