'या' कारणासाठी उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) शुक्रवारी पहिल्यांदाच दिल्लीला जाणार आहेत. या दिल्लीवारीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री झाल्यापासूनची उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची ही पहिली अधिकृत भेट असणार आहे.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: शरद पवारांचीच चौकशी करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेसाठी आले होते. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) देखील विमानतळावर हजर होते. ही दोघांमधील पहिली अनौपचारिक भेट होती. या भेटीचं छायाचित्रही प्रसिद्ध झालं होतं. परंतु या भेटीत दोघांमध्ये कुठली चर्चा झाली नव्हती. 

त्यानंतर आता मुख्यमंत्री राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींची (pm modi) भेट घेणार आहेत. राज्यासमोरील प्रश्न आणि त्याला केंद्राची आवश्यक असणारी मदत, केंद्र सरकारकडे जीएसटीसहीत (gst) विविध योजनांचा अडकलेला निधी या विषयांवर उद्धव ठाकरे (cm thackeray) पंतप्रधानांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. 

या दिल्लीवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (congress president sonia gandhi) यांची भेट घेतील की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा- वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर

पुढील बातमी
इतर बातम्या