Advertisement

वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण (aimim waris pathan) आपल्या चिथावणीखोर भाषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर
SHARES

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे माजी आमदार वारिस पठाण (aimim waris pathan) आपल्या चिथावणीखोर भाषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीएए आणि एनआरसीविरोधात (caa and nrc) आयोजित कार्यक्रमात भाषण करताना आम्ही १५ कोटी असलो, तरी १०० कोटींवर भारी आहोत. आता तर फक्त महिलाच बाहेर आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आम्ही बाहेर आलो तर तुमचं काय होईल, अशा शब्दांत त्यांनी भाजपला इशारा दिला. या विधानावर आक्षेप घेत भाजपसोबत (bjp) मनसेनंही पठाण (mns) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

हेही वाचा- योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक

भायखळ्यातील एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गामध्ये एक भाषण केलं होतं. या भाषणात त्यांनी गेल्या २ महिन्यांपासून सीएए आणि एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीन बाग (new delhi shaheen bagh) परिसरातील रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिलांचं (muslim women proesters) उदाहरण देत भाजपला इशारा दिला. 

पठाण आपल्या भाषणात म्हणाले, जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आम्हीही शिकलो आहोत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नसेल, ती गोष्ट आता हिसकावून घ्यावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. आम्हाला बोलतात की आया-बहिणींना पुढं पाठवलं आणि स्वत: ब्लॅंकेटमध्ये बसलेत. पण त्यांना सांगू इच्छितो की आता तर फक्त सिंहिंणीच बाहेर पडल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला आहे. जर आम्ही देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो, तर तुमचं काय होईल, याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा- नाहीतर, मुख्यमंत्र्यांना कोंडून ठेवू, तृप्ती देसाईंचा इशारा

त्याला प्रतिउत्तर देताना, पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही देखील हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी केली.

तर, वारीस पठाण यांना मनसे इशारा देऊ इच्छितो "दगडाच उत्तर दगडांनी आणि तलवारीला उत्तर तलवारीने" असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी पठाण यांना इशारा दिला. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा